Friday, October 31, 2014

एकटेपणा!

आज पहाटे तीनच्या सुमारास जाग आली. परत झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही येईना. शेवटी उठून अभ्यासाला बसलो. तो पण काही होत नव्हता. प्रिया आणि स्वप्निल शी बोललो. छान वाटल. अस वाटत आहे आज पहिल्यांदा मी होस्टेल लाईफ जगत आहे.

हा एकटेपणा खायला उठतो. पप्पांनी कस केल असेल ना! ते कोरेगावला असताना एकटेच राहायचे. तिकडे तर त्यांना काहीच नव्हत. किती एकटेपणा खायला उठत असेल ना त्यांना. पण आज पटत आहे, जोपर्यंत माणूस इकटा राहत नाही तोपर्यंत तो शिकत नाही. सगळ्या गोष्टी ह्या बाहेर राहिल्यावरच कळतात.

अस वाटत आहे गुगल कराव आणि बघाव कि एकटेपणा घालवण्याचे १०१ प्रकार. स्वप्निलला पण किती एकट वाटत असेल इकडे आल्याआल्या.

Saturday, October 11, 2014

आज खूप दिवसांनी ब्लॉग लिहावा म्हणतोय.  माझ स्वप्न MS करायचं. UTDच admit पण आल. पहिले पहिले खूप सोप्प वाटलं. बाळाला घरी ठेऊन इकडे अमेरिकेत शिकायचं. स्वतःच स्वप्न पूर्ण करायचं. पण सगळ काही वाटत तेवढ सोप्प नाही ह्याची प्रचीती आली. विहान जसा जसा मोठा होतोय तशे तशे त्याचे नखरे वाढत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी मिस करतोय. कधी कधी तर वाटत तो मला ओळखेल कि नाही.

प्रिया: पण ह्या सगळ्यामध्ये मला माझ्या बायकोची खूप साथ मिळत आहे. खरच मानल तिला. मी असतो तर मला राहावल नसत. तिच्या मुळेच एवढ यायचं धाडस करू शकलो. मला कधी कधी वाटत ह्या सगळ्या संसारात मी स्वार्थी होऊन निर्णय तर घेत नाहीये ना! कारण कधी कधी तिला आई, पप्पा, विहान ह्या सगळ्यांमध्ये स्वतःला वेळच देता येत नाही. तरीपण जिद्दीने ती आता बऱ्याच गोष्टींमध्ये स्वतःला झोकून देत आहे.

आई: आई बद्दल काय बोलू. तिला माझ्याशिवाय नाही जमत माहिती आहे. खर सांगायचं तर तिच्या मनात काय आहे कळत मला. तिला माझ्या पुढच्या शिक्षणाच्या बाबतीत काय वाटत कळत नाहीये अजून. ती कशी काय हो म्हणाली मला? बहुतेक माझ स्वप्न आहे म्हणूनच स्वतःच्या मनावर दगड ठेवला असेल.

पप्पा: कुठल्याही बापाला आपल्या पोराची प्रगती व्हावी हेच वाटत आणि माझ्या पप्पांच पण वेगळ मत नाहीये. पण त्यांना सुद्धा आता जास्त दगदग होत नाही. तरीपण ते आता खूप काही करतात. असा बाप कोणाला नको वाटणार नाही. जस आईच्या मनातल कळत तसं पप्पाच्या मनातल नाही कळत मला. ताई पप्पांच्या बाबतीत खूप वेळेस बरोबर अस्ते. ती पप्पांना चांगल ओळखते.

ताई: खूप लोकांकडून असं ऐकल आहे की मुलींचं लग्न झाल तरी त्या त्यांच्या आई बापाला कधी सोडत नाहीत जरी वेगळ्या घरात राहायला गेल्या तरी. खर आहे. माझ्या जॉबमुळे मला मैसूर, तिरुवनंतपुरमला जाव लागल आणि आता शिक्षणासाठी अमेरिकेत. ह्या काळात ताई सारखी आई पप्पांच्या जवळ राहिली. त्यात आमच्या भौजीनचा वाटा खूप अनमोल.